इंडीयाज नेक्स्ट सुपरस्टार हा रियालिटी शो सध्या सुरू आहे.देशातील सामान्य माणसां तील होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रियांका चोपडा या कार्यक्रमात सहभागी झाली आहे.हिंदी चित्रपट सृष्टीत तरुण होतकरू अभिनेत्रींची लैंगिक पिळवणूक केली जाते का, या प्रश्नावर प्रियांका उद्गारली, “मुलीच नव्हे, तर पुरुषांनाही लैंगिक सतावणुकीला सामोरं जावं लागतं!” प्रियांकाच्या या वक्तव्याला दुजोरा देताना या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ऋत्विक धनजानी म्हणाला, “चित्रपट क्षेत्रात खालच्या स्तरावरील काही लोक या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवख्या तरूणांच्या असहाय्यतेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करतात. बडे, प्रस्थापित दिग्दर्शक आणि निर्माते असं कधीच करीत नाहीत. या क्षेत्रात केवळ उत्तम आणि सुशील लोकांबरोबरच काम करण्याची संधी लाभली, हे माझं सुदैव आहे.”
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews